Premium|Sayali Patil Entrepreneurial Journey : भारतीय सुगंधाची नवी ओळख

The Six Scents Brand Story : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न तीन वेळा अपूर्ण राहिल्यानंतर सायली पाटील यांनी कोल्हापुरातून अत्तर, परफ्युम आणि धूपकांडीच्या व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
The Six Scents Brand Story

The Six Scents Brand Story

esakal

Updated on: 

सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com

परंपरेत रुजलेला भारतीय सुगंध आधुनिक रूपात जगभर पोहोचवण्याच्या ध्यासातून कोल्हापूरच्या सायली पाटील यांनी ‘द सिक्ससेंट्स’ हा ब्रँड उभा केला. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न तीन वेळा अपूर्ण राहिले; मात्र त्यातून खचून न जाता स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेत त्यांनी अत्तर, परफ्युम आणि धूपकांडीच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची ही सुगंधी यशोगाथा...

अत्तराचा नाद दर्शवणारी

‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ ही लावणी मराठी रसिक मनाला नवी नाही. देवघरात लावल्या जाणाऱ्या सुगंधी द्रव्यांपासून बनवल्या जाणाऱ्या उदबत्तीची किंवा धूपकांडीची ओळखही भारतीय संस्कृतीला नवी नाही. अत्तराचे शौकीन असणारे बालगंधर्व आणि त्यांच्या नाटकापूर्वी उडवले जाणारे अत्तराचे फवारेही नाटकवेड्या मराठी मनाला नवे नाहीत. अत्तराचा आणि परफ्युमचा व्यवसाय महाराष्ट्राला नवा नाही. एस. एच. केळकर ही १९२२ मध्ये स्थापन झालेली कंपनी सुगंधनिर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आपले नाव मुद्रांकित करणाऱ्या नव्या कंपन्याही अनेक आहेत. कोल्हापूरच्या सायली पाटील यांची ‘द सिक्ससेंट्स’ ही त्यापैकीच एक...

प्रशासकीय सेवेचे स्वप्न

सायली पाटील. कोल्हापूरच्या एका सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी. तिच्या डोळ्यांत स्वप्न होते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर सायलीने फायनान्स आणि एचआरमध्ये एमबीए पूर्ण केले. तीन वेळा तिने प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली. तीनही वेळा ती मुलाखतीपर्यंत पोहोचली; पण यशाने दिलेली हुलकावणी अखेरपर्यंत कायम राहिली. अपयश पदरी पडूनही सायली हार मानणारी नव्हती. तिने कॉर्पोरेट क्षेत्रात काही काळ नोकरी केली; पण तिचे मन त्या नोकरीत रमले नाही. आपण स्वतःचे काहीतरी स्टार्ट-अप सुरू केले पाहिजे, असे तिला राहूनराहून वाटत होते.

Loading content, please wait...