Premium|Screen Time vs Reading : मोबाईल की पुस्तक? मुलांच्या मेंदूसाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर

Child Brain Development : मोबाईल आणि स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर होणारा परिणाम, कागदावरील वाचनाचे फायदे आणि पालकांनी योग्य सवयी कशा लावाव्यात यावरील मार्गदर्शन.
Screen Time vs Reading

Screen Time vs Reading

esakal

Updated on

रिता राममूर्ती गुप्ता - info@reetaramamurthygupta.in

मुलांच्या हातात मोबाईल द्यावा की पुस्तक, हा प्रश्न आज जवळपास प्रत्येक पालकासमोर आहे. नव्या संशोधनातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, की स्क्रीनपेक्षा कागदावरील वाचन मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि आकलनशक्तीसाठी अधिक लाभदायक ठरते.

पालक म्हणून तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे, की तुमच्यासमोर दोन वेगळ्या समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे तुमच्या मुलाला वाचनासाठी प्रवृत्त न करू शकणे आणि दुसरी म्हणजे त्याला स्क्रीन पाहण्यापासून रोखू न शकणे. या दोन स्वतंत्र समस्या मिळून एक अत्यंत मोठी समस्या बनतात. हा एक दुहेरी फटका आहे! मी या समस्येवर टप्प्याटप्प्याने मात करण्याचा एक मार्ग सुचवला आहे. तो प्रत्येक पालकाला माहीत असणे आवश्यक आहे.

स्लो डोपामाइनची जादू

तुमच्या मुलाचा निकोप विकास हा संशोधक ज्याला ‘स्लो डोपामाइन’ म्हणतात त्यावर अवलंबून असतो. मूल एक ध्येय ठरवते. त्यासाठी सातत्याने धडपडते, प्रयत्न करीत राहते, अपयशी ठरते; पण हार न मानता पुन्हा प्रयत्न चालू ठेवते आणि शेवटी यशस्वी होते. या संपूर्ण प्रक्रियेतून मिळणारे न्यूरोकेमिकल रिवॉर्ड (मेंदूतील रासायनिक बक्षीस) मुलांमध्ये अपयश पचवण्याची ताकद, चिकाटी आणि पुढे कृती करण्याची प्रेरणा निर्माण करते.

टचस्क्रीन उपकरणे याच्या अगदी उलट काम करतात. ती अवघ्या काही सेकंदांच्या चक्रात ‘फास्ट डोपामाइन’ (fast dopamine) देतात. (स्क्रोल करणे... उत्तेजना, स्वाइप करणे... नवीन उत्तेजना). त्यामुळे कोणत्याही मेहनतीशिवाय लगेच आनंद मिळण्याची सवय लागते. हे इतके सोपे आहे, की मुलांना वाट पाहणे किंवा प्रयत्न करणे याची गरजच भासत नाही.

स्क्रीनच्या सान्निध्यात वाढणाऱ्या मुलांच्या मेंदूची रचना त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी पुरेशी विकसित होत नाही. यामुळे होणारे नुकसान म्हणजे वयाच्या २ ते ९ वर्षांच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात मुलांच्या ‘प्रीफ्रंटल’ (prefrontal) मेंदूच्या, जो विचार, निर्णयक्षमता आणि आत्मनियंत्रणाशी संबंधित असतो, विकासात होणारी घट, जी स्पष्टपणे मोजता येते. मात्र यात बदल करण्याची संधी आपल्या हातात आहे. खेळ, संवाद आणि मुलाला आयुष्यभरासाठी एक चांगला वाचक बनवणे यांसारख्या उपक्रमांद्वारे हा बदल घडवता येतो. ही सुवर्णसंधी जन्मापासूनच सुरू होते आणि योग्य सवयी लावल्या, तर मुलाच्या भविष्यासाठी भक्कम पाया तयार होऊ शकतो.

हा मुद्दा अधिक स्पष्टपणे समजून घ्यायचा असेल, तर खालील अभ्यासाकडे एक नजर टाकूया, जो या संकल्पनेला सोप्या आणि ठोस पद्धतीने उलगडून दाखवतो.

Screen Time vs Reading
Premium|Indian Languages and Their Evolution : भारतीय भाषांच्या उत्क्रांतीची रंजक कहाणी उलगडणारे महत्त्वाचे पुस्तक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com