

Health risks of sitting
esakal
तुम्ही सुद्धा तासनतास लॅपटॉपवर काम करताय का? कामावर जाताना बसून प्रवास करायचा, कामावरून आल्यानंतर मोबाईलवर वेळ घालवायचा. चालणं नाही, व्यायाम नाही, कष्टाची कामं नाहीत अशीच लाईफस्टाईल तुम्ही सुद्धा जगत असाल तर तुम्ही गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता.
१९५० मध्ये बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या आरोग्यावर झालेले संशोधन
लोकांना सुरुवातीला वाटत होतं की बसून काम करणं म्हणजे सगळ्यात आरामदायी काम. त्यामुळे कोण कुठे आजारी पडतंय का? मग १९५० मध्ये UK मध्ये एक संशोधन झालं. त्या संशोधनात शहरातल्या डबल डेकर बसवर काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टर लोकांचा अभ्यास केला गेला. त्यात असं आढळलं की चालक लोकांमध्ये हार्टअटॅकमुळे मरणाऱ्यांची संख्या कंडक्टर लोकांच्या तुलनेत दुप्पट होती. कारण बस चालक दिवसभरात ९०% वेळ बसूनच काम करायचे आणि कंडक्टर मात्र डबल डेकरवर दिवसभरात ६०० पेक्षा जास्त पायऱ्या चढायचे. त्यामुळे बैठ्या कामांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, हे मात्र सिद्ध झालं.
पुढे त्यानंतर झालेल्या अनेक संशोधनांनी हे दाखवून दिलं की, अशा प्रकारची लाईफस्टाईल म्हणजेच सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा, टाइप 2 डायबेटीस, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा अनेक आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच आज आपण सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे कोणते आजार होतात आणि या आजारांपासून वाचण्यासाठी काय करायचं याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.