
आपल्याला कोणत्याही व्यक्तीकडून फसवणूक होणं आवडत नाही; मग तो आपला मित्र, बॉस, एखादा अनोळखी किंवा आपला मुलगा असो. मात्र ‘एआय’ आपली फसवणूक करू लागला, तर काय होईल?
आपण ‘एआय’ला एक मित्र मानतो; तो आपले प्रश्न सोडवतो, हवामानाचे अंदाज सांगतो, आजार ओळखतो, ऑफिसचे काम करतो. माझे अनेक पत्रकार मित्र म्हणतात की लेख लिहायला आधी जेवढे तास लागायचे, ते काम ‘एआय’ काही मिनिटांत करतो. वकील केस स्टडी पाहण्यासाठी ‘एआय’ वापरतात. पण आता आपल्याला एक नवीन गोष्ट शिकावी लागेल; ‘एआय’ देखील आपली फसवणूक करू शकतो! गेल्या काही वर्षांत ‘एआय’ने जाणीवपूर्वक माणसांना फसवल्याचे अनेक किस्से समोर आले आहेत. अगदी जे इंजिनिअर्स त्याला तयार करतात, त्यांनाही ‘एआय’ फसवू लागला आहे.