

Capital Gain Tax on Gold
esakal
सुहास दंडे - suhasdande@gmail.com
सोने किंवा चांदीचे दागिने, नाणी किंवा बार खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी विक्री केल्यास त्यातून मिळणारा नफा हा भांडवली लाभ (कॅपिटल गेन) म्हणून गणला जातो. दोन वर्षांच्या आत विक्री केल्यास तो अल्पकालीन भांडवली लाभ (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन) मानला जातो आणि तो व्यक्तीच्या उत्पन्नाच्या स्लॅबनुसार करपात्र असतो (जास्तीत जास्त ३० टक्क्यांपर्यंत). दोन वर्षांनंतर विक्री केल्यास तो दीर्घकालीन भांडवली लाभ (लाँग टर्म कॅपिटल गेन) मानला जातो आणि त्यावर सुमारे १२.५ टक्के दराने कर भरावा लागतो. या करमोजणीसाठी खरेदीची तारीख आणि किंमत यांचा अचूक पुरावा आवश्यक असतो.