
धर्मेंद्र
saptrang@esakal.com
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात विक्रम करणारे चित्रपट खूप झाले, पण रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ अक्षरशः दंतकथा ठरला. संवाद, गाणी, कथानक आणि भावभावनांनी भरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा यामुळे तो मनोरंजनाचा हुकमी एक्का ठरला.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने असा इतिहास घडवला की पुढची अनेक वर्षे यशाची ताकद मोजताना त्याची तुलना ‘शोले’शीच केली जाऊ लागली. तो यशाचा मापदंडच ठरला. या चित्रपटाला येत्या १५ ऑगस्टला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त वीरू साकारणारे धर्मेंद्र आणि बसंती झालेल्या हेमामालिनी यांनी जागवलेला तो कालखंड...