Premium|Women Entrepreneurship : गृहिणी ते कोट्यवधींचा फर्निचर ब्रँड: पुरुषप्रधान क्षेत्रात शुभांगी माळींच्या ‘वाइल्डवेस्ट वूड्स’ची प्रेरणादायी वाटचाल

Women Entrepreneurs in India : २० वर्षे गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर, सांगलीच्या शुभांगी माळी यांनी लॉकडाऊनच्या काळात 'वाइल्डवेस्ट वूड्स' या लाकडी फर्निचर ब्रँडची मुहूर्तमेढ रोवून कोट्यवधींची उलाढाल करणारा यशस्वी उद्योग उभा केला आहे.
Women Entrepreneurship

Women Entrepreneurship

esakal

Updated on

प्राची गावस्कर- rachigawaskar@gmail.com

सांगलीसारख्या तुलनेने छोट्या शहरातून, पारंपरिक सॉ-मिल व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या शुभांगी माळी यांनी धाडस, कल्पकता आणि जिद्दीच्या जोरावर ‘वाइल्डवेस्ट वूड्स’ हा लाकडी फर्निचरचा ब्रँड उभा केला. ‘लॉकडाउन’सारख्या कठीण काळात, जिथे अनेक व्यवसाय थांबले होते, तिथे त्यांनी संधी ओळखली आणि घराघरात पोहोचणाऱ्या कॉफी टेबलपासून सुरुवात करून आज एक यशस्वी मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड उभारला आहे. एका सामान्य गृहिणीपासून ते यशस्वी उद्योजिका बनलेल्या शुभांगी माळी यांची जिद्द, संघर्ष आणि यशाची प्रेरणादायी कहाणी खास ‘सकाळ मनी’साठी या मुलाखतीतून उलगडली आहे.

प्रश्न : तुमचा व्यवसाय कधी आणि कसा सुरू झाला?

शुभांगी : माझा व्यवसाय २०२० च्या लॉकडाउनच्या काळात सुरू झाला. त्या वेळी डालगोना कॉफी खूप लोकप्रिय झाली होती आणि लोक घरातच कॅफेचा अनुभव घेत होते. त्यातूनच मला वाटलं, की कॉफीसोबत कॉफी टेबलही प्रत्येक घरात पोचायला हवं. माझ्या कुटुंबाचा लाकूड वखारीचा (सॉ-मिल) व्यवसाय ४०-५० वर्षांपासून आहे. त्यामुळे आमच्याकडे विविध प्रकारचे नैसर्गिक लाकडी प्लॅंक्स उपलब्ध होते. या लाकडांमधून काहीतरी वेगळं आणि क्रिएटिव्ह बनवता येईल, या विचारातूनच मी लाकडी फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. खरं तर, मी त्याआधी मी कोणताही व्यवसाय केलेला नव्हता, की घरातील व्यवसायात कधी लक्ष घातले होते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना लग्न झाले आणि मी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून गेले. दरम्यान, काही काळ मी हॉबीक्लब ॲक्टिव्हिटी चालवले. जवळपास २०-२५ वर्षे गृहिणी म्हणून जगल्यानंतर एक उद्योग उभारण्याचे पाऊल उचलणे तेही कोरोना महासाथीच्या कठिण काळात हे मोठे आव्हान होते. पण मला स्वतःची ओळख निर्माण करायची होती आणि त्यातूनच मी मला संधी मिळाली तेव्हा हे धाडस करायचा निर्णय घेतला आणि या व्यवसायाची अगदी छोट्या स्वरुपात सुरुवात केली.

प्रश्न : फर्निचरचा व्यवसाय तसा पुरुषप्रधान, या क्षेत्रात महिला फार दिसत नाहीत, अशावेळी या क्षेत्रात उतरताना काय मानसिकता होती?

शुभांगी : लॉकडाउनमध्ये उपलब्ध असलेल्या रॉ-मटेरियलमुळे आणि आधीपासून असलेल्या क्रिएटिव्ह कल्पनांमुळे मला या व्यवसायात उतरायची प्रेरणा मिळाली. अगदी छोट्या लाकडी वस्तू, जसे कॉफी टेबल तयार करून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले, तेव्हा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईहून काही व्यावसायिक खास मला भेटायला आले. एका महिलेनं छोट्या शहरात असा व्यवसाय सुरू करणं त्यांच्यासाठी आश्चर्यकारक होतं. त्यांच्या कौतुकामुळे मला खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच माझी भीड, भीती दूर पळाली आणि घरातून भक्कम पाठिंबा होताच; तसेच, माझ्या मैत्रिणींचेही प्रोत्साहन मिळाले, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. त्यामुळे आता पुढे टाकलेले पाऊल मागे घ्यायचे नाही, भले हे क्षेत्र पुरुषप्रधान असले, तरी हे मी पक्के केले होते. त्यामुळे मी नेहमी सकारात्मक भूमिकेतून पुढे जात राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com