

Congress Leadership Crisis Karnataka
esakal
कर्नाटकात डी. के. शिवकुमार यांच्या रणनीतीचा आजपर्यंत गौरव केला गेला, पण पद देताना सिद्धरामय्या यांचाच विचार केला गेला. त्या वेळी अडीच वर्षांचा करार झाल्याच्या गोष्टीबद्दल सोईस्कर मौन पाळण्यात आलं. आजपर्यंत पक्षीय पातळीवर यावर कधीच जाहीर भाष्य केले गेले नाही. आता नक्की कुणाला निवडायचं हा पेच पक्षश्रेष्ठींसमोर आहेच. यातून कसा मार्ग निघतो हे महत्त्वाचं ठरेल.