

Why SIPs Get Discontinued
esakal
निरंजन दांडेकर - niranjandandekar2007@gmail.com
मोबाईलवरील काही क्लिकमध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सुविधा आज सहज उपलब्ध झाली आहे. मात्र, गुंतवणूक सुरू करणे जितके सोपे झाले आहे, तितकेच ती दीर्घकाळ सातत्याने टिकवून ठेवणे कठीण ठरत आहे. ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’ बंद होण्याचे वाढते प्रमाण हेच दाखवून देते, की दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि भावनिक आधारही तितकाच महत्त्वाचा आहे.
गेल्या काही वर्षांत भारतातील फिनटेक कंपन्यांनी आणि मोबाईल ॲपनी सर्वसामान्य गुंतवणूकदाराला एका क्लिकवर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ‘शून्य कमिशन’, ‘थेट गुंतवणूक’ आणि ‘कागदपत्रांशिवाय दोन मिनिटांत एसआयपी सुरू करा’ अशा आकर्षक घोषणांमुळे कोट्यवधी तरुण आणि नवोदित गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित झाले. मात्र, गुंतवणूक सुरू करणे जितके सोपे आहे, तितकेच ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे कठीण असते. आज बाजारात किंचितशी अस्थिरता आली किंवा वैयक्तिक जीवनात आर्थिक अडचण निर्माण झाली, की या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘एसआयपी’ बंद किंवा स्थगित करण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढते.