

Bihar Election Margin Of Victory
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. ‘एनडीए’ने घवघवीत यश मिळवून महाआघाडीला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहे. विजेता उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीतील अंतर यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. हा मुख्य निकालांपेक्षा पूर्णपणे वेगळी कहाणी सांगतो. बिहार विधानसभेच्या निवडणुकांवर हा मापदंड लागू केला असता एक मुद्दा प्रकर्षाने दिसतो. १६ मतदारसंघांमध्ये निकाल एक टक्क्यांपेक्षा कमी फरकाने लागला. याचा अर्थ असा की, विजेता आणि दुसऱ्या क्रमांकावरचा उमेदवार यांच्या मतांत अवघ्या एक टक्क्याचे अंतर होते.