डॉ. अजित कानिटकर
सध्याच्या काळात कौशल्यशिक्षणास पर्याय नाही. ‘लर्निंग टू लर्न’ आणि ‘लर्निंग टू अनलर्न’ हा या पुढील काळाचा मंत्र आहे. नोकरी, स्वयंरोजगार अथवा उद्योजकता, या सर्वच ठिकाणी सतत शिकत राहण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
‘नो करी द्या हो नोकरी’ अशी वणवण करत भटकणाऱ्या शेकडो युवकांसाठी खरोखरी काही दुसरे पर्याय आहेत का? या प्रश्नाचे सरळ सोपे उत्तर अवघड आहे. पण यापुढील काळात नोकऱ्या सहजासहजी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे नोकरी शिवायचे तीन तरी पर्याय युवक- युवतींनी शाळेत असल्यापासूनच डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत.