Premium|Smita Patil Acting : नजरेतून बोलणारी अभिनेत्री

Smita Patil Acting and Human Sensitivity : सहजसुंदर अभिनय, नजरेतून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि सहकलाकारांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारा संवेदनशील स्वभाव यांमुळे स्मिता पाटील आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात.
Smita Patil Acting and Human Sensitivity

Smita Patil Acting and Human Sensitivity

esakal

Updated on: 

दिलीप ठाकूर - sakal.avtaran@gmail.com

स्मिता पाटील यांचा अभिनय पाहताना संवादांची गरज अनेकदा कमी होते. एखादी नजर, क्षणभर थांबलेला कटाक्ष किंवा चेहऱ्यावर उमटलेली अस्पष्टशी छटा प्रेक्षकांपर्यंत व्यक्तिरेखेच्या मनातील असंख्य भावना पोहोचवते. अभिनय शिकू इच्छिणाऱ्या आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीने त्यांचे चित्रपट आवर्जून पाहावेत, असे म्हणूनच वाटून जाते...

स्मिता पाटील यांच्या संवेदनशील स्वभावाची आठवण सांगताना अभिनेत्री अलका कुबल यांचा एक अनुभव आवर्जून सांगता येईल. रवींद्र धर्मराज दिग्दर्शित ‘चक्र’ (१९८१) या हिंदी चित्रपटात अलका कुबल यांना स्मिता पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. अलका सांगतात, ‘‘चित्रपटाचे रात्रीचे चित्रीकरण असायचे. संध्याकाळी सहाला सुरू झालेले काम पहाटे चार-पाचपर्यंत चालायचे. माझी आई दिवसभर शाळेत असायची. मग माझ्यासोबत चित्रीकरणाला यायची. पॅकअप झाल्यावर आम्ही चेंबूरहून बसने दादरला आणि तिथून ट्रेनने घरी जायचो. एकदा पहाटे स्मिताजींनी आम्हाला बसथांब्यावर पाहिले. रस्त्यावर कोणीच नव्हते. त्यांनी गाडी थांबवली, आम्हाला घेतले आणि दादर रेल्वे स्थानकाला सोडले. माझ्या आईला त्या म्हणाल्या, ‘पुन्हा या मुलीला घेऊन असे एकट्या उभ्या राहू नका. वयात आलेली मुलगी आहे.’ त्यानंतर त्या रोज पॅकअप झाल्यावर आम्हाला दादरला सोडायच्या.’’ हा अनुभव नायिका म्हणून वाटचाल करताना मला खूपच सदुपयोगी ठरला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दुसऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेणारी ही संवेदनशीलता स्मिताजींच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com