

Social Brain Theory Marathi
Sakal
एडवर्ड थॉर्नडाइक या अमेरिकी मानसशास्त्रज्ञाने सामाजिक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला तेव्हा त्याने बुद्धिमत्तेचे तीन प्रकार सांगितले. संकल्पना, कल्पना व तर्कशक्ती; वस्तू अन् साधने हाताळण्याची क्षमता आणि लोकांशी योग्य वर्तन करण्याची क्षमता, अशा तीन प्रकारांमध्ये त्याने बुद्धिमत्तेची वर्गवारी केली. जेव्हा कुठे तुम्हाला कुणाच्या वर्तनात विरुद्ध बदल जाणवेल तेव्हा समजा त्याचा केमिकल लोच्या झालाय. मी म्हणजे ब्रह्मांड म्हणणारा असा चिकित्सक बुद्धिहीन मुक्तात्मा तुम्हाला दिसला, तर समजा त्याचा सिद्धांत गंडलाय.
सर्व प्रकारचे मानसशास्त्रीय सिद्धांत मानवी वर्तन समजावण्याचा प्रयत्न करतात; परंतु सामाजिक मेंदू सिद्धांत हा उत्क्रांतीवर आधारित आणि वैज्ञानिकदृष्ट्या अधिक मूळ कारण शोधणारा सिद्धांत आहे.