
Emotional manipulation
esakal
एखादी पोस्ट करमणूक म्हणून ठीक आहे. मात्र, जेव्हा करमणूक गंभीर होते किंवा नुकसानदायक व्हायला लागते, तेव्हा आपण स्वतःहून थांबलं पाहिजे. कोणीतरी अनोळखी व्यक्ती पोस्ट करून आपल्या भानवांशी खेळते आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे.
‘अरे काय बाई आहे रे ही!?’ हलक्या आवाजात माझा मित्र म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक चावट हसू होतं. मी पण तेवढ्याच हलक्या आवाजात त्याला विचारलं, ‘कोण बाई? आणि काय केलं काय तिने?’ तो गालात हसला आणि त्याने नजर खिडकीच्या बाहेर टाकली... आम्ही मुंबईवरून पुण्याला चाललो होतो. काही वेळा रेल्वे वेळ नाही पाळत, माणसाची गैरसोय होते; पण प्रवास सुखाचा होतो आणि आमचं सुदैव किंवा नशीब म्हणा, आम्हाला आरक्षित सीट मिळाली. म्हणून आम्ही प्रवासासाठी रेल्वे निवडली. मला न राहवल्याने पुन्हा विचारलं, ‘अरे कोण बाई? आणि काय म्हणाली तुला?’ मित्र हसत म्हणाला, ‘अरे मला नाही काही म्हणाली; पण तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.’ काय पोस्ट केली आहे दाखव? मी त्याच्या मोबाईलकडे बघत म्हणालो.