
मधुबन पिंगळे
सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर नावाचा नवा वर्ग उदयास आला आहे. मात्र, ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर यामागे असणाऱ्या धोक्यांचीही जाणीव झाली आहे. प्रसिद्धी, पैसा यांच्या आमिषाने या घटकांना देशविरोधी कारवायांसाठी वापरून घेतले जाऊ शकते, हेच या प्रकरणांनंतर समोर आले आहे.
पंजाबमध्ये चार जून रोजी जसबीर सिंग या यूट्यूबरला अटक करण्यात आली. तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होता, आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.