

Human-tiger conflict impact research
esakal
डॉ. मिलिंद वाटवे
डोळे उघडे ठेऊन खरोखरच्या समस्यांवर उपयुक्त काम करावं असं विद्यापीठ आणि संशोधनसंस्थांमधे सहसा कुणाला वाटते आहे, असे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर ताडोबाच्या ईशान्येकडील अनेक गावातील लोकांनी आपल्या समस्यांवर केलेला अभ्यास हा अशा उपयुक्त संशोधनाचा एक वस्तुपाठ म्हणावा लागेल.
सं शोधन कुणी करावं? कोण करू शकतो? याचं उत्तर भक्ती कुणी करावी याच्यासारखंच आहे. भक्ती आणि कर्मकांड यांचा जो संबंध आहे, तोच संशोधन आणि ‘पीएचडी’ यांचा आहे. बऱ्याचदा विद्यापीठे आणि त्यांच्या चौकटी या कर्मठपणा वाढवतात. त्याचीच मक्तेदारी तयार होते. परंतु त्यांच्याखेरीज उत्तम दर्जाचे संशोधन शक्य आहे, इतकंच नव्हे तर अधिक चांगल्या प्रकारेही होऊ शकते. याचा एक अनुभव नुकताच आला.