Premium|Solapur Bhuikot Fort History : सोलापूरचा भुईकोट आणि सिद्धेश्वर मंदिर; प्राचीन वारसा अन् श्रद्धेच्या अतुट नात्याचा इतिहास

Ancient Temples in Solapur Fort : प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेला सोलापूरचा भुईकोट, सिद्धेश्वर महाराजांची महान परंपरा आणि 'भारताचे मँचेस्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या ऐतिहासिक प्रवासाचा वेध घेणारा हा विशेष लेख वाचकांसाठी सोलापूरची नवी ओळख करून देईल.
Solapur Bhuikot Fort History

Solapur Bhuikot Fort History

esakal

Updated on

सोलापूरचा भुईकोट नेमका कधी बांधण्यात आला, याबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. या भुईकोटात असणारे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, महाकालेश्‍वर मंदिर, शनी मंदिर, मुजाबाबा मंदिर, नागदेवतेची शिल्पं यावरून हा तो प्राचीन आहे, हे स्पष्ट होते. प्राचीन घटनांचा साक्षीदार म्हणून तो ओळखला जातो.

सोलापूर हे पश्‍चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या सोलापूर शहराला प्राचीन इतिहास आहे. सोळा गावांच्या समूहाला ‘सोळापूर’ ही ‘सोलापूर’ची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. सोन्नलगे यावरूनच ‘सोलापूर’ हे नाव रूढ झाले, असे म्हटले जाते. मोगलकाळात याला ‘सन्दलापूर’; तर शिवकाळात ‘सोलापूर’ हे नाव रूढ झाले.

सोलापूर शहराला खूप मोठा प्राचीन वारसा लाभलेला आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, बहमनी, निजामशहा, आदिलशहा, मोगल, मराठा आणि इंग्रजांनी येथे राज्य केले. सोलापूर हे भारतातील महत्त्वाचे कापड उत्पादन केंद्र होते. एके काळी या शहराला ‘भारताचे मँचेस्टर’ म्हटले जात असे. सोलापुरी चादर, टॉवेल आणि कलात्मक कापड जगभर निर्यात होत असे. सोलापूरची शेंगा चटणी, सोलापूरची कडक भाकरी जगभर प्रसिद्ध आहे. १८५९ मध्ये सोलापूरला रेल्वे आली. चीनमध्ये जाऊन वैद्यकीय सुविधा देणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे सोलापूरचे सुपुत्र होते.

Solapur Bhuikot Fort History
Premium|Ancient Indian Civilization Architecture : धोलावीरा: हडप्पाकालीन नगररचनेचे अद्वितीय दर्शन
Loading content, please wait...

Related Stories

Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
Ancient Marvel Rises from the Waters: Palasnath Temple Draws Visitors as Reservoir Shrinks
Vasai Fort
Mystery Tunnel Found at Base of Visapur Fort Sparks Historical Curiosity in Maval
Marathi News Esakal
www.esakal.com