Premium|Share Market Price : सणासुदीच्या काळात कोणत्या शेअरवर लक्ष ठेवाल?

Pine Labs Share Price Target : शेअर बाजारातील घसरणीदरम्यान सोलर इंडस्ट्रीज आणि पाईन लॅब्ज या कंपन्यांकडे गुंतवणुकीच्या संधी म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या व्यवसायवाढीची कारणे, आर्थिक अपेक्षा आणि उद्दिष्टित भाव जाणून घ्या.
Share Market Price

Share Market Price

esakal

Updated on: 

सिद्धार्थ खेमका - मोतीलाल ओसवाल

फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

भू -राजकीय परिस्थिती आणि जागतिक संकेतांमुळे सध्या शेअर बाजारात नरमाईचे वातावरण आहे. घसरणीत खरेदीची संधी असली, तरी नेमके कोणते शेअर घ्यावेत आणि कधी घ्यावेत, असा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात असतो. चांगल्या शेअरची निवड अतिशय महत्त्वाची असते. यासाठी काही शेअरची शिफारस येथे केली आहे.

(उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष)

सोलर इंडस्ट्रीज (उद्दिष्ट : रु. २३,०००)

ही भारतातील व्यावसायिक स्फोटकांच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असून, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये तिचा व्हॉल्यूमच्या दृष्टीने सुमारे २६ टक्के बाजारहिस्सा होता. कंपनीकडे स्फोटक उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे. ओम्निया कंपनीच्या अधिग्रहणामुळे विशेषतः दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय व्यवसायाला बळ मिळाले असून, मागील पातळीवरून पुरवठा साखळी मजबूत करण्यास आणि दीर्घकालीन स्फोटक व्यवसायाच्या वाढीस मदत होत आहे. स्फोटकांच्या पलीकडे जाऊन संरक्षण क्षेत्रातही कंपनी विस्तार करत आहे. यशस्वी व्यावसायिकीकरणामुळे महसुलाचे स्रोत अधिक वैविध्यपूर्ण होऊ शकतात. आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत संरक्षण व्यवसायाचा कंपनीच्या एकूण व्यवसायातील वाटा २२ टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

पाईन लॅब्ज (उद्दिष्ट ः रु. २५०)

या कंपनीने पेमेंट्स, ग्राहकांना सुलभ वित्तपुरवठा, कार्ड/पेमेंट साधने जारी करणे आणि फिनटेक पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले मर्चंट-कॉमर्स व्यासपीठ उभारले आहे. कंपनीकडे १० लाखांहून अधिक व्यापारी, ७५० हून अधिक ब्रँड्स व उद्योगसमूह आणि २०० हून अधिक वित्तीय संस्था ग्राहक म्हणून आहेत. कंपनीच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रॅन्झॅक्शन प्लॅटफॉर्म आणि इश्युइंग अँड ॲक्वायरिंग प्लॅटफॉर्म या व्यवसायांमधून महसूलवाढीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यांची वाढती संख्या, ग्राहकांसाठी सुलभ वित्तपुरवठा आणि व्यवहारांवर आधारित महसूल यामुळे पाठबळ मिळेल. आर्थिक वर्ष २०२६ ते २०२८ दरम्यान महसूल, समायोजित इबिटा आणि नफ्यात अनुक्रमे २४ टक्के, ४६ टक्के आणि १२९ टक्के सीएजीआर अपेक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com