
संदीप वासलेकर
saptrang@esakal.com
कोरियन केवळ अमेरिकेत बनवलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहून ‘एआय’ स्वीकारत नाहीत. दक्षिण कोरिया हे ‘एआय’च्या भविष्यासाठी संतुलित दृष्टिकोन कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण आहे. ‘एजीआय’चा पाठपुरावा करणारे शास्त्रज्ञ ब्यून्ग आणि ‘एआय’वर बंधने घालणारे कायदेतज्ज्ञ चोई दोघांनाही त्यांच्या समाजाच्या भविष्याची चिंता आहे. कोरियातील ‘एआय’च्या जादूई जगाविषयी...
हा लेख वाचण्याआधी कृपया यू-ट्यूबवर जा आणि Eternity कोरियन पॉप ग्रुप किंवा IIternity चॅनेल उघडा. तिथे DTDTGMGN या विचित्र नावाचा एक व्हिडिओ सुरू करा. स्क्रीनवर दोन महिला गायिका दिसतात. त्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनींसारख्या दिसतात. त्या नाचतात, वारंवार कपडे बदलतात, गातात. त्यांच्या खट्याळ चेहऱ्यावरील हावभाव तुम्हाला स्क्रीनवर खिळवून ठेवतात.