Premium| Starlink India launch: भारतात स्टारलिंकची झेप, लवकरच सुरू होणार उपग्रह इंटरनेट सेवा

Starlink internet service: एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची उपकंपनी असलेली ‘स्टारलिंक’ लवकरच भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. या सेवेच्या माध्यमातून देशातील दुर्गम भागांनाही वेगवान इंटरनेट मिळणार आहे
Starlink India launch

Starlink India launch

esakal

Updated on

या व्यतिरिक्त, मासिक सबस्क्रिप्शनची किंमत तीन हजार ३०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. ही किंमत पारंपरिक ब्रॉडबँड सेवांपेक्षा जास्त आहे; परंतु सध्या देशात उपलब्ध असलेल्या इंटरनेट सेवेपेक्षा स्टारलिंकची सेवा अधिक गतिमान आणि प्रभावी असल्याचा दावा केला जातो. हा दावा कितपत खरा ठरतो, हे सेवा सुरू झाल्यानंतरच कळेल.

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या खासगी अवकाश कंपनीची उपकंपनी असलेल्या आणि उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या स्टारलिंकबाबत जगभरात कुतूहल आहे. अनेक देशांमध्ये ही सेवा सुरू झाली असून, मागील काही वर्षांपासून भारतीयांना प्रतीक्षा आहे; मात्र लवकरच ही सेवा भारतात सुरू होण्याची चिन्हे आहेत.

सध्या जगभरात चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे एलन मस्क. टेस्ला, स्पेसएक्स, एक्स, दि सोलार सिटी, दि बोरिंग कंपनी, न्यूरालिंक आदी कंपन्यांच्या माध्यमातून जगभरात आपल्या उद्योगसेवांचा विस्तार करीत आहेत. स्पेसएक्स या खासगी अंतराळ संशोधन संस्थेद्वारे मस्क यांच्याकडून अवकाशविज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. काही वर्षांपूर्वी स्पेसएक्सच्या माध्यमातून खासगी अंतराळ पर्यटनाचे दरवाजेही खुले झाले. केवळ अवकाशविज्ञानच नव्हे, तर स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवाप्रणालीमार्फत जगभरात वेगवान इंटरनेट सुविधाही स्पेसएक्स कंपनीकडून पुरवली जाते. त्यांनी जगभरातील दुर्गम भागातही इंटरनेट सेवा उपलब्ध केली.

आपत्कालीन परिस्थिती जगाच्या पाठीवरील कोणत्याही कोपऱ्यात स्टारलिंककडून इंटरनेट सेवा पुरविली जाते. सध्या जगातील ११० देशांमध्ये उपलब्ध असलेली स्टारलिंकची इंटरनेट सुविधा लवकरच इतरही अनेक देशांमध्ये सुरू होणार आहे. काही देशांमध्ये चाचण्या सुरू आहेत, तर काही देशांमध्ये सेवा सुरू करण्याबाबतची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

भारतातही मागील काही वर्षांपासून स्टारलिंक इंटरनेट सेवेबाबत प्रतीक्षा केली जात आहे. भारतात ही उपग्रहीय इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी स्पेसएक्सला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे; मात्र त्याचाच भाग म्हणून सुरक्षा चाचणी सुरू झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरणाने (ट्राय) सेवेच्या किमतीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही सेवा भारतात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com