Premium|The Golden Deer of Markets : शेअर बाजारातील ‘सुवर्णमृग’चा मोह; तेजीच्या बाजारात चमकणाऱ्या प्रत्येक शेअरच्या मागे धावू नका

Stock Market Golden Deer : शेअर बाजारातील आकर्षक संधी गुंतवणूकदारांना मोहात पाडू शकतात. मात्र चमकदार कथा, नव्या कल्पना आणि तेजीच्या वातावरणात तर्क, मूल्यांकन, जोखीम आणि गुंतवणुकीची शिस्त विसरणे धोकादायक ठरू शकते.
Stock Market Golden Deer

Stock Market Golden Deer

esakal

Updated on

अमित बिवलकर - amit.bivalkar@eqiruswealth.com

शेअर बाजारात प्रत्येक तेजीच्या काळात एखादा ‘सुवर्णमृग’ जन्माला येतो. तो इतका आकर्षक दिसतो, की गुंतवणूकदार अनेकदा तर्क, मूल्यांकन आणि जोखीम यांचा विचार बाजूला ठेवून त्याच्या मागे धावू लागतात. शेअर बाजारात नेहमीच अशा आकर्षक संधी निर्माण होत राहतील, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण वाटेल. नव्या कल्पना समोर येतील, नव्या कथा लक्ष वेधून घेतील आणि गुंतवणुकीच्या जगात नवे सुवर्णमृग धावताना दिसतील. परंतु, चमकणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे धावणे ही शिस्तबद्ध गुंतवणूकदाराची भूमिका असू नये.

‘सुवर्णमृग कधीही अस्तित्वात नव्हता आणि कधी असणारही नाही. संकट जवळ येते तेव्हा सर्वप्रथम माणूस आपली विवेकबुद्धी गमावतो,’ असे महर्षी व्यासांनी म्हटले आहे. शेअर बाजार अस्तित्वात येण्याच्या खूप आधी महाभारतात अशा एका मानवी प्रवृत्तीचा उल्लेख आढळतो, जिच्याशी गुंतवणूकदार आजही झुंजताना दिसतात. एखादी गोष्ट इतकी आकर्षक वाटते, की तिच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते आणि त्या मोहापुढे तर्क मागे पडतो, ही ती प्रवृत्ती. रामायणात मारीच स्वतःला सुवर्णमृगाच्या रूपात सादर करतो. सीतेला तो दिसतो आणि ती रामाला तो पकडून आणण्याची विनंती करते. असा प्राणी प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकत नाही, हे माहीत असूनही राम त्याच्या मागे जातात. क्षणिक आकर्षणातून घेतलेला तो निर्णय पुढे अनेक घटनांना कारणीभूत ठरतो आणि मोठे संकट ओढवते. गुंतवणुकीच्या बाबतीतही अनेकदा असेच घडते. एखादी गोष्ट खूपच चमकदार दिसू लागली, की तर्कशक्ती मागे पडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com