
Human evolution
esakal
आगीचा शोध लागल्यानंतर माणसाच्या कल्पनाशक्तीचा पुनर्जन्म झाला असावा. कारण त्यानंतर तो आपल्या शिकारीच्या कथा इतरांना रंगवून सांगायला लागला. भाषेच्या विकासासोबतच सामाजिक एकता आणि मूल्यांचा विचार करायला लागला. माणसाच्या कथा फक्त माहितीच नाही, तर नियम आणि मूल्ये शिकवू लागल्या. त्यातूनच माणसाची काय चांगले आणि काय वाईट हे ठरवण्याची, मूल्ये समजण्याची सुरुवात झाली.
ठलेही नाते घट्ट होण्यासाठी त्यात विश्वास तयार व्हायला लागतो. एकदा का नात्यांवरचा आपला विश्वास ठाम असला, की मग माणसे एकमेकांवर अवलंबून राहायला लागतात. नात्यांमधील बंध जेवढा घट्ट होत जातो तेवढा त्याचा नाते विस्तारण्यासाठी अधिक उपयोग व्हायला लागतो. माणसे का विस्तारत गेली, त्यातही त्यांच्यातील वाढता विश्वास हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. आज जरी माणूस जगण्याच्या शर्यतीत स्वतःशीच झुंजताना दिसत असला तरी माणसांना माणसांविषयी असलेला ममत्वभाव कसा वृद्धिंगत झाला, त्या कथा फार चमत्कारिक आहेत.