
डॉ. तानाजी आ. भोसले
साखरेचे विक्रीदर कमी मिळत असल्याने आणि ऊस उपलब्धता कारखानागणिक कमी झाल्याने साखर कारखानदारी किफायतशीर राहिलेली नाही. त्यामुळे व्यावसायिक रीतीने उपाययोजना केल्याशिवाय साखर विक्रीदर आणि गाळपहंगाम कालावधी वाढणार नाही. या प्रश्नावर विविधांगी उपायांची आवश्यकता आहे.
सन २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाकरिता ऊसाच्या १०.२५ टक्के पायाभूत साखर उताऱ्यासाठी ३५५०रु. प्रति मेट्रिक टन अशी वाजवी व किफायतशीर किंमत केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केली. ती मागील वर्षाच्या (३४००) वाजवी व किफायशीर किंमतीच्या तुलनेत ४.४१ टक्यांनी जास्त आहे. परंतु सन २०१९ मध्ये निश्चित केलेल्या रु.३१०० प्रतिक्विंटल या साखरेच्या किमान विक्रीकिंमतीत केंद्राने आजअखेर काहीही बदल केलेला नाही.