

Maharashtra teacher recruitment criteria bias
esakal
डॉ. दिलीप चव्हाण
उच्चशिक्षणातील गुणवत्तेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, यात शंका नाही. त्यामुळे गुणवत्तावाढीचे प्रयत्न करायला हवेतच; मात्र त्यातून नवी श्रेणीबद्धता अथवा नवा भेदभाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जावी.
राष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीत महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांची दयनीय स्थिती उघड झाली आहे, सबब, महाराष्ट्र सरकारने विद्यापीठीय गुणवत्तावृद्धीसाठी शिक्षकभरतीसाठी नवी नियमावली तयार केली आहे.
पूर्वीप्रमाणे, ‘सेट’ किंवा ‘नेट’ किंवा पीएच.डी.धारक उमेदवाराची थेट मुलाखतीतून सहायक प्राध्यापकाची निवड ही पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे. नव्या नियमावलीत शैक्षणिक कामगिरी, अध्यापन, संशोधन यांना ७५ टक्के आणि मुलाखतीला २५ टक्के गुण राखून ठेवले आहेत.