
Cyber Fraud
esakal
मुंबई: आपल्या देशात मागील वर्षात ऑनलाइन फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. भारतीयांनी २०२४ मध्ये अशा फसवणुकींना बळी पडत २२,८४५ कोटी रुपयांहून अधिक पैसे गमावले आहेत. २०२३ च्या तुलनेत मागील वर्षभरात जवळपास २०६% वाढ झाली आहे. ५ वर्षांपूर्वी हे प्रमाण खूपच कमी होतं, पण आता आपलं जगणं मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे या समस्या देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या आहेत.
त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकींना बळी पडू नये म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ही काळजी कशी घ्यायची हे जाणून घेवूया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून