
शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मुलांच्या पालकांना कायम एक भीती असते, ती म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेची. केरळमधील रॅगिंगच्या घटना किंवा कोटामधील आत्महत्यांच्या बातम्या वाचल्यावर प्रत्येक पालकाच्या हदयात एक कळ उठतेच.
दुसरीकडे विद्यार्थी आत्महत्या वाढतायत, असं नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल सांगतो. सर्वसामान्यत: आत्महत्येच्या प्रमाणात दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ दिसली आहे तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात हीच वाढ दुप्पट म्हणजे ४ टक्के आहे.
अशावेळी करायचं काय? तज्ज्ञांची मदत केव्हा घ्यायची? मुळात आपल्या मुलाच्या मनात जीवन संपवण्याविषयक विचार येतायत हेच कसं ओळखायचं? मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात?