Premium|Student Mental Health : गुणांच्या स्पर्धेपलीकडे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार का गरजेचा?

The Need for Trained Counsellors in Every School : गुण आणि टक्केवारीपलीकडे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार होणे गरजेचे आहे. परीक्षेचा ताण, अपयशाची भीती आणि कौटुंबिक संघर्ष हाताळण्यासाठी प्रत्येक शाळेत प्रशिक्षित समुपदेशक असणे आवश्यक आहे.
Student Mental Health

Student Mental Health

esakal

Updated on: 

सुदाम कुंभार - sakal.avtaran@gmail.com

आपल्या शिक्षण व्यवस्थेत ‘यश’ या संकल्पनेची व्याख्या अनेकदा गुण आणि टक्केवारीभोवती केंद्रित झालेली दिसते. विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर पडल्यापासून ‘किती टक्के मिळतील?’ आणि निकालानंतर ‘किती टक्के मिळाले?’ हे प्रश्न त्याचा सातत्याने पाठलाग करतात...

गुण, निकाल आणि स्पर्धेच्या पलीकडे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचाही विचार होणे गरजेचे आहे. गुणपत्रिका विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती सांगते; पण त्याचे मन सुरक्षित आहे की नाही, हे सांगत नाही. म्हणून आज प्रश्न केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांचा किंवा निकालाचा नाही, तर तो आहे त्यांच्या मनाचा, त्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या भावनिक स्वास्थ्याचा. म्हणूनच आता ठामपणे विचारण्याची वेळ आली आहे, की प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित समुपदेशक का नाही?

शाळेत विद्यार्थ्याला गणित शिकवण्यासाठी गणित शिक्षक असतो, विज्ञान शिकवण्यासाठी विज्ञान शिक्षक असतो आणि शारीरिक विकासासाठी क्रीडा शिक्षक असतो; पण जेव्हा त्याच विद्यार्थ्याच्या मनात परीक्षेचा ताण, स्पर्धेचे दडपण, अपयशाची भीती, नैराश्य, कौटुंबिक संघर्ष, एकाकीपणा, न्यूनगंड किंवा आत्महत्येचे विचार निर्माण होतात, तेव्हा त्याला समजून घेण्यासाठी, त्याचे म्हणणे संवेदनशीलपणे ऐकून घेण्यासाठी आणि योग्य वेळी आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक शाळेत प्रशिक्षित समुपदेशक आहे का? याच संदर्भात शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम, गुणपत्रिकेतील गुण, पालकांच्या पाल्यांकडून असलेल्या अपेक्षा, शालान्त परीक्षांचे निकाल आणि त्याकडे पाहण्याची पालकांची मानसिकता, अंतर्गत मूल्यमापनातील गुण अशा विविध विषयांवर आजपर्यंत अनेक लेखांतून मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com