
परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, उत्तम शिक्षण घ्यावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सकाळ प्लसच्या लेखात वाचा ५ महत्त्वाच्या परदेशी शिक्षणविषयक शिष्यवृत्त्यांसंबंधी. त्याच बरोबर शिष्यवृत्त्यांसाठी लागणारी कागदपत्र, गुणपत्रकं आणि विद्यापीठ निवड, या सगळ्याविषयी जाणून घेऊ सकाळ प्लसच्या विशेष लेखातून.
तुम्हाला माहितीय का अनेक सरकारी योजनांद्वारे तुम्ही फक्त मेरिटच्या बळावर परदेशातल्या मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकता. आज फक्त अमेरिका, पाकिस्तान आणि युके या ठिकाणी दरवर्षी जवळ जवळ 4 लाख मुले शिक्षणासाठी जातात.
नंदूरबारची निकिता सोनावणे सध्या स्कॉटलंडच्या University of Edinburgh मधून Msc In Entrepreneurship and Innovation विषयाचं शिक्षण घेत आहे. निकिता महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण घेतेय. ती म्हणते, आजही भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गरीब आणि मागास वर्गाचं प्रतिनिधित्व १% पेक्षाही कमी आहे. मात्र सरकारच्या अनेक योजना उपलब्ध आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांना नवनव्या संधी मिळतात. यवतमाळचा सचिन तालकोकुलवार स्कॉटलंडच्याच ग्लासगो विद्यापिठातून महाराष्ट्र शासनाच्या OBC परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती अंतर्गत शिक्षण घेतोय. सचिन म्हणतो की, या योजना म्हणजे केवळ शैक्षणिक साहाय्य नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी संधी आहे. तर युके मधून शिक्षण घेणारा सौरभ हातकर म्हणतो पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्ती योजना म्हणजे अनमोल संधी आहे.