Premium|Styrenix Engineering Plastics : आरोग्यसुरक्षा व्यवसायातील वाढीमुळे कंपनीच्या विस्ताराच्या संधी वाढल्या

Business Growth and Stock Target : भक्कम व्यवसायवाढ, नफ्यातील वाढ आणि भविष्यातील विस्ताराच्या संधी पाहता विविध क्षेत्रांतील काही कंपन्या गुंतवणूकदारांच्या रडारवर असून, त्यात शैली इंजिनिअरिंग प्लॅस्टिक्सचाही समावेश आहे.
Styrenix Engineering Plastics

Styrenix Engineering Plastics

esakal

Updated on: 

सिद्धार्थ खेमका

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

भक्कम व्यवसायवाढ, वाढता नफा आणि भविष्यातील विस्ताराच्या संधी यामुळे काही निवडक शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. विविध क्षेत्रांतील या १० कंपन्यांबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे.

(उद्दिष्टपूर्ती कालावधी : एक वर्ष)

शैली इंजिनिअरिंग प्लॅस्टिक्स (उद्दिष्ट : रु. ४०७४)

या कंपनीकडे प्रिसिजन प्लॅस्टिक उत्पादनातील कौशल्याचा चार दशकांचा अनुभव असून, ती आरोग्यसुरक्षा, ग्राहकोपयोगी उत्पादने, वैयक्तिक निगा, उपकरणे, वाहने उद्योगातील जागतिक बड्या कंपन्यांना सेवा देते. आयकिया, युनिलिव्हर, जिलेट, पी अँड जी, जीई व गॅरेट यांसारख्या कंपन्या तिच्या ग्राहकांमध्ये आहेत. कंपनीच्या आरोग्यसुरक्षा व्यवसायाला भक्कम वेग असून, जीएलपी-१ व इन्सुलिन पेनची मागणी वाढत आहे. अर्थवर्ष २६ ते २८ या कालावधीत कंपनीच्या महसूल, व्याज, कर, घसारा व कर्जमाफीपूर्व उत्पन्न आणि निव्वळ नफ्याचा चक्रवाढ वार्षिक विकासदर अनुक्रमे ३३ टक्के, ४४ टक्के व ४८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच, अर्थवर्ष २८ अखेर शेअरवरील परतावा आणि भांडवली परतावा अनुक्रमे २९ टक्के व ३९ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com