

Time Management Tips for Entrepreneurs
esakal
तेनालीरामन- मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिश्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व! आजच्या एकविसाव्या शतकात एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनालीरामन आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो. ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून व्हॅल्यू चेन ॲनालिसिसचे महत्त्व जाणून घेऊ या.
दरबारात महाराज जनतेच्या व्यथा जाणून घेत होते. तेव्हा मिस्टर बॅगेश्वर अतिशय चिंतेने महाराजांना आपली व्यथा सांगू लागले. ‘‘महाराज, माझ्या कंपोस्टेबल बॅग उत्पादन कंपनीमध्ये सतत उत्पादन सुरु असतं, नवनव्या ऑर्डर येत राहतात, तरीही नफा अपेक्षेप्रमाणे वाढत नाहीये.’’