Sudhagad
Esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे
धोंडसेमार्गे सुधागडावर आल्यानंतर महादरवाजा लागतो. तो अत्यंत आखीव-रेखीव, मजबूत, सुरक्षित आणि मनमोहक आहे. त्याचा आकार गोमुखी आहे. शत्रूंना दरवाजा कोणत्याही परिस्थितीत तोडता येणार नाही, इतका तो मजबूत आहे. रायगड आणि सुधागडच्या महादरवाजामध्ये कमालीचे साधर्म्य आहे.
सुधागड गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. तो समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर आहे. हा गड अभेद्य, अजिंक्य आणि चढाईसाठी कठीण असला तरी खूप आनंददायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने अन् शौर्याने पावन झालेला हा गड आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा सुधागड हा साक्षीदार आहे.