

Vacation planning and travel
esakal
तुम्ही जर नेहमीच्या मानसिकतेनं रिसॉर्टवर गेलात, म्हणजे घरापासून लांब कुठेतरी जायचं, दिवसभर कुठली कुठली पर्यटनस्थळं पाहत भटकायचं आणि फक्त झोपायला रिसॉर्टला यायचं, तर तुम्हाला रिसॉर्ट महागडी आणि ‘वेस्ट ऑफ मनी’ वाटतील.
‘‘मॅम, आप भी एक रिसॉर्ट खरीदलो...’’
‘‘दिलीप, रिसॉर्ट खरीदनेका नही... जिनका रिसॉर्ट है उनको दोस्त बनानेका । फिर अपनेको रिसॉर्ट में रहनेको मिलता और रिसॉर्ट मेंटेनभी नही करना पडता ।’’ यूट्यूबवर फराह खान तिच्या कूकला, जग्गू दादाच्या रिसॉर्टमध्ये उभं राहून हे ज्ञान देत होती.
बॉलिवूडमध्ये ओळखपाळख असेल तर ही आयडिया प्रॅक्टिकल आहे, पण तुमच्या-आमच्यासारख्यांनी म्हणजे ज्यांना बॉलिवूडवाले तिकीट काढल्याशिवाय ओळख दाखवत नाहीत, अशांनी काय करायचं? तर अशांनी एखाद्या रिसॉर्टवर ट्रिप काढायची. खरं सांगू का? फार आधी मला हे रिसॉर्ट वगैरे उगाच फॅड वाटायचं. एवढे पैसे भरून फक्त एका जागी जाऊन दोन-चार दिवस थांबायचं, हे माझ्यासारख्या ‘सगळं कव्हर झालंच पाहिजे बरं का’ संघटनेच्या खंद्या कार्यकर्त्याला कसं पटणार! पण जसजसा मी रिसॉर्टचा अनुभव घेत गेलो, तसं माझं हे मत बदलत गेलं...