Premium| Summer health risks : उष्माघाताचा धोका वाढतोय; लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घ्या

Heat stroke prevention: उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रण बिघडल्यास उष्माघात होतो, जो जीवघेणा ठरू शकतो. योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो
Summer health risks

Summer health risks

esakal

Updated on

मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की, दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच आरोग्याविषयीचा धोका सुद्धा वाढत आहे. बऱ्याचदा आपण उन्हामुळे साधी चक्कर आहे, डोकं दुखतंय किंवा थकवा आहे असं म्हणतो. परंतु अज्ञानामुळे आणि निष्काळजीपणामुळे या गोष्टी तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात. कारण या उन्हामुळे तुम्ही कधी उष्माघाताचे म्हणजेच (Heat Stroke)चे शिकार व्हाल, हे तुम्हालाही समजणार नाही!

WHO च्या अहवालानुसार २०१७-२०२१ या ४ वर्षांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांमधील उष्णतेमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तब्बल ८५% ने वाढले आहे. तुम्ही विचार करत असाल की उष्णतेचा सर्वाधिक धोका विषुववृत्तावर असणाऱ्या आफ्रिकन देशांना असतो, तर WHO चा १९ वर्षांचा अभ्यास सांगतो की दरवर्षी जगभरात जवळजवळ ४ लाख ८९ हजार लोक उष्णतेमुळे मृत्यूमुखी पडतात. आणि त्यातील ४५% लोक हे आशियाई देशांमधील असतात.

उष्माघाताचा सर्वाधिक धोका लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांना असतो. त्यामुळे या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यायला हवी. आणि जर तुम्ही शहरांमध्ये राहत असाल, तर उष्णतेचा धोका अजूनच वाढतो कारण Heat Island Effect म्हणजेच काँक्रीट आणि डांबरामुळे उष्णता जास्त साठवली जाते. उष्माघात नेमका कसा ओळखायचा? त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती? आणि तो टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांबरोबर चर्चा केली. हे सर्व सविस्तर आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com