

Sunil Dutt
sakal
दिलीप ठाकूर-glam.thakurdilip@gmail.com
अभिनेता म्हणून सुनील दत्त यांच्या प्रगतिपुस्तकावर कायमच फोकस टाकला जातो. अभिनेता म्हणून त्यांनी साठ व सत्तरच्या दशकातील आघाडीच्या अनेक निर्माता आणि दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून भूमिका साकारल्या. मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५७), बिमल रॉय दिग्दर्शित ‘सुजाता’ (१९६०), बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’ (१९६४), यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ (१९६५), राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा साया’ (१९६७), ए. सुब्बाराव दिग्दर्शित ‘मिलन’ (१९६८) असे काही चित्रपट विशेष उल्लेखनीय.