
डॉ. अनिल लचके
आठ दिवसांचा प्रवास आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ लांबला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन्ही अंतराळयात्रींना अवकाश स्थानकावर राहून वैज्ञानिक प्रयोग करण्याचा आणि स्थानकावरील विविध यंत्रणांची देखभाल करण्याचा पूर्वानुभव होताच, त्यामुळे वेळापत्रक चुकलं तरी वेळ वाया गेला असं मात्र दोघांनाही वाटलं नाही.