कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर आपले सहकारी बुच विल्मोर यांच्यासह सुरक्षित पृथ्वीवर परतल्या आहेत. एवढा दीर्घकाळ अवकाशात राहून अन् काही कोटी किलोमीटर प्रवास अन् पृथ्वीभोवती हजारो वेळा अवकाशातून प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम या अंतराळवीरांनी केला आहे. अवकाशात दीर्घकाळ राहण्याचा मानवी शरीरावर कोणते परिणाम होतात, या दिशेनेही अभ्यासास मदत मिळणार आहे. ही माहिती ‘नासा’ आणि इतर अंतराळ संस्थांना भविष्यातील मंगळ मोहिमांसारख्या मोहिमा आखण्यास मदत करेल.
नासा’ची भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स जगभरात चर्चेत आहेत. नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर त्या आपला सहकारी बुच विल्मोरसह सुरक्षित पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांचे आठवडाभर अंतराळात राहण्याचे नियोजन होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा मुक्काम लांबला. सप्टेंबरमध्ये त्यांना घेऊन येण्यासाठी गेलेले अंतराळयान त्यांच्याशिवाय परतले. या आठवड्यात ते निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह या अंतराळवीरांसह त्या ‘स्पेसएक्स क्रू ड्रॅगन’ कुपीमधून पृथ्वीवर परतल्या.