Premium|Supreme Court on Obscenity : शिवी म्हणजे अश्लीलता? सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा अर्थ

Swear Words in Society : शिवी, अश्लीलता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांच्यातील सीमारेषा सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाच्या निमित्ताने मिश्कील शैलीत उलगडत भाषेच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा लेख.
Supreme Court on Obscenity

Supreme Court on Obscenity

esakal

Updated on

मिलिंद शिंत्रे - sakal.avtaran@gmail.com

भाषेत काही शब्द असे असतात, जे लिहायला संकोच वाटतो; पण राग, आनंद किंवा जिव्हाळ्याच्या क्षणी ते सहज ओठांवर येतात. शिव्या त्यापैकीच एक! सभ्य समाज त्यांच्याकडे नाक मुरडून पाहतो; तरीही दैनंदिन जगण्यात त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर ‘शिवीपुराणा’चा घेतलेला मिश्कील वेध...

सभ्य समाजात ओव्यांना जे स्थान आहे, ते शिव्यांना नाहीय आणि ते असूही नये, असं आमचं मत असताना, सर्वोच्च न्यायालयाने आताच एका खटल्याच्या निकालात असं म्हटलं, की केवळ अपशब्दांचा वापर, शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह शब्दांचा उच्चार करणं म्हणजे अश्लीलता ठरत नाही. भाषा कितीही अपमानकारक किंवा असभ्य असली तरी केवळ त्या आधारावर अश्लीलतेचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही! ही बातमी वाचून आम्ही तीन ताड उडालो. आमच्या गोळ्या कपाटात गेल्या. (इथे आम्हाला नक्की काय लिहायचे आहे, ते वाचकांना कळले असावे, अशी आशा व्यक्त करतो.) आणि आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट झाला. तसंच आमचा आत्मविश्वासही वाढला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com