

IAS Supriya Sahu
esakal
एक आयएएस अधिकारी एका डिपार्टमेंटचा कायापालट करू शकतो. एका जिल्ह्याचं प्रशासन बळकट करू शकतो किंवा जास्तीत राज्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकतो हे तुम्ही ऐकलं असेल. पण आपल्या देशाच्या एका महिला आयएएस ऑफिसरने जागतिक पातळीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
सुप्रिया साहू यांनी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळवला आहे. हा संयुक्त राष्ट्रांकडून दिला जाणारा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा पर्यावरण पुरस्कार आहे. यामुळे भारताला पर्यावरण रक्षणाचं यशस्वी मॉडेल देणारा देश म्हणून जगभर प्रसिध्दी मिळाली आहे.
लहानपणापासूनच पर्यावरणावर जिवापाड प्रेम असणाऱ्या सुप्रिया यांची तमिळनाडू येथे पोस्टिंग झाली तेव्हा त्यांनी पाहिलं की प्लॅस्टिकच्या बेसुमार वाढीमुळे जंगलातील प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. हे पाहिल्यावर त्यांनी ‘ऑपरेशन ब्लू माउंटन’ हातात घेतलं. सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली, झाडे लावण्याची मोहिम हातात घेतली आणि एका दिवसात ४२ हजार झाडे लावण्याचा विक्रम करत काही दिवसातच या संकटावर मात केली.
असाच एक अद्भूत उपक्रम हातात घेवून त्यांनी गरिबांच्या हजारो रूपयांची बचत केली आणि पर्यवरणाला ग्रीन हाऊस इफेक्ट पासून वाचंवलं. युनायटेड नेशन्सला सुध्दा भूरळ घालणारे साहू यांचे हे सगळे उपक्रम नक्की आहेत तरी काय? आणि जगाच्या पर्यावरण वर्तुळात भारताची मान उंचावणारा हा पुरस्कार का महत्त्वाचा आहे? हे जाणून घेवूया सकाळ+च्या या लेखातून.