मुंबई: नुकतीच विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ही निवृत्ती जाहीर करत असताना दोघांनीही इथून पुढचा अधिकचा वेळ हा आमच्या कुटुंबाचा असेल असे सांगितले. हेच नाही तर याआधी निवृत्त झालेला सर्वांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर देखील हेच म्हणाला होता. तो फक्त म्हणाला नाही, तर त्याने ते केले देखील. त्याचे आजही सोशल मीडियावर घरगुती कामे करतानाचे, मुलांसोबत वेळ घालविण्याचे फोटोज व्हायरल होतात.
केवळ क्रिकेटरच नव्हे तर अनेक क्षेत्रातील मंडळींसाठी आता कुटुंब आणि त्यासाठीचा वेळ हा पहिल्या प्राधान्याचा विषय ठरतो आहे. पण एकुणातच लोकांना आता फॅमिली टाईम का महत्वाचा वाटू लागला आहे..? कोव्हीडनंतर हे चित्र बदललंय का? किती टक्के लोकांना कुटुंबाला वेळ देणे महत्वाचे आहे असे वाटते आहे? कुटुंबात घालविल्या जाणाऱ्या वेळेविषयी सध्याचे पुरुष काय म्हणतात? मानसिक आरोग्यासाठी आणि एकूणच चांगल्या आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी कुटुंबाचा वेळ खरंच आवश्यक असतो का? या विषयी तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून...