Suryakumar Yadav Biography
esakal
Premium|Suryakumar Yadav Biography : सूर्यकुमार यादव: संघर्षातून विश्वविजयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
वृषाल करमरकर - vrushal.karmarkar@esakal.com
वयाच्या तिशीनंतर टीम इंडियात एंट्री आणि पस्तिसाव्या वर्षी विश्वकरंडक जिंकणारा कर्णधार... क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजयापर्यंतच्या प्रवासाची यशोगाथा प्रेरणादायी आहे. सूर्याची कथा सांगते, की स्वप्न पूर्ण होण्यासाठी वय अडथळा ठरत नाही. जिद्द, मेहनत आणि संयम असेल, तर उशिरा का होईना; पण यश नक्की मिळतं.
क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू लहान वयातच प्रसिद्धी मिळवतात. काही जण २०-२२व्या वर्षीच भारतासाठी खेळायला लागतात; पण काही खेळाडूंचा प्रवास वेगळा असतो. त्यांना आपली वेळ येण्यासाठी खूप वर्षं संघर्ष करावा लागतो... तो प्रवास संघर्षाने भरलेला, संयमाने घडलेला आणि उशिरा मिळालेल्या यशाने उजळलेला असतो. सूर्यकुमार यादवचा क्रिकेट प्रवासही अशीच जिद्द, मेहनत आणि कधीही हार न मानण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. संघर्ष, संयम आणि जिद्दीची भावनिक यशोगाथा आहे.

