Premium| Maharashtra Future: महाराष्ट्र देशाला दिशा देण्यास सज्ज!

Maharashtra Sustainable Growth: ग्रामविकासात शिक्षण, आरोग्य, पोषण यांचा विचार व्हावा. महाराष्ट्राचा पुढाकार देशासाठी दिशादर्शक.
Sustainable Maharashtra
Sustainable Maharashtraesakal
Updated on

डॉ. सतीश करंडे

पुढील पंचवीस वर्षांमध्ये आमूलाग्र असे बदल होणार आहेत, असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्याची दोन कारणे दिली जातात पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचे परिणाम आणि दुसरे हवामानबदल आणि त्याचे परिणाम. हे दोन्ही विषय भारतासारख्या देशाला जिथे सर्वांत जास्त लोकसंख्या आहे आणि सर्वांत जास्त शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या असणारा देशसुद्धा भारत देशच आहे जोडीला सर्वांत जास्त युवा असणारा देशसुद्धा पुन्हा भारत देशच आहे.

महाराष्ट्र राज्य देशाला दिशा देणारे काम उभे करू शकते. त्यासाठी पुढील पंचवीस वर्षांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे लागेल. ते लोकांच्या आपसातील चर्चेतून, लोकांबरोबर झालेल्या राज्यकर्त्यांच्या चर्चेतून, संशोधकांच्या संशोधनातून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यातून, धोरणकर्त्यांच्या संवेदनशीलतेतून आणि लोकांवर प्रभाव टाकेल अशा शाश्वत विकास चर्चेतून तयार झाले पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com