
दीनानाथ लालचंद यांच्याशी बोलतच होते, मी पाच गाणाऱ्या
मुलांना जन्म दिलाय, असे म्हणून ते सांगू लागले,
ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आणि आई
रखमाबाई यांनी दरिद्री, बहिष्कृत अवस्थेत
चार अलौकिक मुलांना जन्म दिला.
निवृत्तिनाथ, ज्ञाननाथ, सोपाननाथ आणि
मुक्ताबाई.
‘निवृत्ती’ ज्ञात झाली की ‘ज्ञान’
ज्ञान झाले की ‘सोपान,’ म्हणजे मार्ग
आणि मार्ग मिळाला की ‘मुक्ती.’
या चौघांची ‘निवृत्ती,’ संत वाङ्मय निर्माण
करती झाली, ज्ञानेश्वरांनी तर
‘‘विश्वतन्मयी पसायदाच्या विदीर्ण दुःखाची
प्रारंभस्पृहा छिलून, तासून सुभग
झालेल्या शब्दांच्या सिद्धीने जन व्याकुळते
झाले आणि ते ज्ञानेश्वरांना ‘माउली’ म्हणू लागले.