
निखिल श्रावगे
दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले रशिया - युक्रेन युद्ध आणि दीड वर्ष सुरू असलेल्या इस्राईल - गाझा संघर्षात इराण आणि रशिया पूर्णपणे गुंतले गेले आहेत. स्वतःचे घर जळत असताना त्यांनी असद यांच्या संरक्षणाला तितके प्राधान्य दिले नाही. हीच वेळ साधून हयात तहरीर अल-शमने असद यांच्या नियंत्रणाखाली असलेला प्रदेश केवळ १५ दिवसांत आपल्या ताब्यात घेतला.