
वॉल्टर स्कॉट
तमिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या महिन्यापासून बरोबर दहा महिन्यांनी तमिळनाडूमध्ये सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी असेल. द्रमुक, अण्णा द्रमुक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रिंगणात असतील. अभिनेता विजय यांचा तमिलग वेत्री कळघम अर्थात टीव्हीके हा पक्षही यंदा निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. या सर्वांना टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही मोठी कंबर कसली आहे. भाजपनेही निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.