

Tamil Nadu drug procurement model
esakal
दीपक जाधव
बनावट औषधे तसेच औषधांमधील भेसळीचे अनेक प्रकार महाराष्ट्र व शेजारील राज्यांत गेल्या दोन वर्षांत उघडकीस आले आहेत. शासकीय यंत्रणेतील उघड झालेला गैरव्यवहार हा हिमनगाचे टोक आहे. किती जणांचे बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येणार आहे?
सरकारी रुग्णालयात बाहेरून औषधे
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे एकाही रुग्णाला बाहेरून औषधे खरेदी करण्यास लावू नये असे स्पष्ट निर्देश कागदोपत्री वेळोवेळी देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र विपरीत परिस्थिती दिसते.
छत्रपती संभाजीनगर येथे जन आरोग्य अभियान व समविचारी संघटनांच्यावतीने घाटी रुग्णालयाच्या आरोग्य सेवेचा एक अभ्यास नुकताच करण्यात आला. घाटी रुग्णालयात पेशंटला बाहेरून औषधे आणायला लावण्याचे प्रमाण किती आहे हे यामध्ये तपासण्यात आहे. घाटी रुग्णालयामध्ये जनऔषधी केंद्र नावाचे औषधांचे दुकान आहे.