
कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
तमिळनाडू विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडताना, त्या दस्तावेजामध्ये रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले. तमीळ भाषेतील आद्याक्षराचा वापर करण्यात आला असून, सांस्कृतिक वारशाचा अभिमान हे चिन्ह वापरल्याचा दावा तमिळनाडू सरकारने केला आहे. मात्र, त्रिभाषा धोरणावरून केंद्र व राज्यातील संबंधांमध्ये तणाव आहे. त्याचाच एक भाग म्हणून या नव्या संघर्षाकडे पाहण्यात येत आहे.
नव्या शिक्षण धोरणासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तमिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. त्यात रुपयाच्या चिन्हाची भर पडली आहे. नुकत्याच मांडण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ‘₹’ या चिन्हाऐवजी तमीळमधील ‘’ हे चिन्ह वापरण्यात आलेले आहे.