
कल्याणी शंकर
तमिळनाडूमध्ये हिंदीविरोधी आंदोलनाने जोर धरला आहे. हिंदी भाषेच्या अतिक्रमणातील तमीळ अस्मितेला धक्का पोहोचेल, ही त्यामागील भावना आहे. मात्र, राजकीय दृष्टीने पाहिले, तर हिंदीविरोधाबरोबरच उत्तरविरोध आणि मोदीविरोधाची ही भावना आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून, केंद्र आणि राज्य सरकारांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.