Premium|Tribal Village Story : नावं, भाषा, शिक्षा आणि बदलांची हृदयस्पर्शी गोष्ट

A Teacher Reaches the Tanda : तांड्यात पोहोचलेल्या शिक्षकाला गावातील अनोखी माणसं, वैशिष्ट्यपूर्ण नावं आणि विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी गावकऱ्यांची धडपड अनुभवायला मिळते. गैरसमजांच्या पलीकडचं तांड्याचं साधं, जिवंत वास्तव समोर येतं.
A Teacher Reaches the Tanda

A Teacher Reaches the Tanda

esakal

Updated on

किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com

सोमवारी साडेदहा वाजायच्या आतच मी तांड्यात पोचलो. पंचायत समितीत मुख्याध्यापकांची सभा असल्यामुळे आज गोरले सर शाळेत येणार नव्हते. मी जसा ऑटोतून उतरलो, तसा मंदिराजवळ बसलेल्या कुणीतरी ‘गुरू आयोनि लडकाऽऽऽ’ अशी जोरदार हाक दिली. शिक्षक आल्याचं त्याने त्यांच्या भाषेत सांगितलं होतं. मी गावात मुलांना बोलवायला गेलो. सोबत राजू चव्हाण नावाचा तरुण होता. तो मला गाव दाखवू लागला. लोकांचा परिचयही करून देऊ लागला. गावात एकूण बेचाळीस घरं होती. एक म्हशींकरिता बांधलेलं बचत गटाचं शेड दिसलं. गावकरी कुतूहलाने माझ्याकडे बघत होते. जे काही गैरसमज तांड्याबद्दल लोकांनी निर्माण केले होते ते उगीचच होते, असं वाटून गेलं.

‘गुरू, हा सरपंच.’

‘‘पण सरपंच तर गणेशपूरला

राहतात ना?’’

‘तसं नाही गुरू. याचं नावंच सरपंच.’

‘सरपंच जागल्या चव्हाण’ या नावाचं मला मोठं नवल वाटलं. सरपंच तरी फक्त पाच वर्षं. हा तर आजन्म सरपंच! सतत दारूच्या नशेत राहणारा पिस्तूल भेटला. लुना, अमेरिका नावाच्या बायाही तांड्यात होत्या. हत्यार, मीटर, ब्रह्मदेव, पिस्तूल, कलेक्टर अशी नावं माझ्यासाठी फारच नवीन होती. राजू मला प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी नेत होता. त्यांचा परिचय करून देत होता आणि ‘गुरू आयोनि लडका. चालनी साळंमा.’ म्हणजेच ‘गुरुजी आले रे पोरा... चल ना शाळेत’ असं विद्यार्थ्यांना सांगत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com