

Indian Air Force
sakal
प्रशांत कोतकर -saptrang@esakal.com
भारतीय वायुदलाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात गेल्या काही दशकांपासून ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) आणि ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ) यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला वास्तवात आणले. आज ‘तेजस एमके-वन ए’ या सुधारित रूपाने भारताने केवळ संरक्षणक्षेत्रात स्वावलंबन साधले नाही, तर जागतिक निर्यातदार राष्ट्रांच्या रांगेत स्थान मिळविण्याच्या दिशेने ठाम पाऊल टाकले आहे. फ्लाइंग डॅगर्स, फ्लाइंग बुलेट्स आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कोब्रा स्क्वाड्रनमध्ये तेजस विमाने टप्प्याटप्प्याने समाविष्ट होतील.