
impact of Telegram’s Chromecast feature on digital security
टेलिग्राम हा जगातील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि तितकाच विवादित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इथे गोपनियतेची हमी तर असतेच पण कंटेंट शेअरिंगवर बंधनं नसतात. त्यामुळेच तरुणाईचा तो अधिक लाडका आहे. पण बंधनं नसण्याचे दुष्परिणाम आता लवकरच दिसू लागलेत. विशेषत: बाहेर कॉपीराइट असलेला कंटेंट इकडे बिनधास्त शेअर होतो. आता तर त्यांनी क्रोमकास्ट हे नवं फीचर आणलंय त्यामुळे ओटीटीला धडकीच भरलीय. काय आहे विषय समजून घेऊया.